Home महाराष्ट्र मी रश्मी वहिनींना एक पत्र लिहिणार आहे……… -चंद्रकांत पाटील

मी रश्मी वहिनींना एक पत्र लिहिणार आहे……… -चंद्रकांत पाटील

110
0

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी आपण मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. सामना अग्रलेखात वापरल्या जाणाऱ्या भाषेसंबंधी चंद्रकांत पाटील त्यांच्याकडे विचारणा करणार आहेत. यावेळी औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्यासंबंधीही त्यांनी भाष्य केलं.यामुळेच सामन्यात त्यांच्यावर अग्रलेख लिहण्यात आला होता.

त्यावर “सामनामधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. या विषयावर मी रश्मी वहिनींना एक पत्र लिहिणार आहे. तुम्ही संपादिका आहात..अग्रलेख तुमच्या नावाने लागतो. आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली तिथे रश्मी वहिनी असणारं संपादकीय असू शकत नाही”.असं म्हणत त्यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

शिवसेनेवर टीका :
“ज्यावेळी हे गोधड्या भिजवत होते तेव्हा बाळासाहेबांनी मागणी केली होती , मग बाळासाहेबांनी केलेली मागणी धरुन धरा. हा काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद असून आम्हाला यात पडायचं नाही,” असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here