Home इतर कर्नल नरेंद्र कुमार यांचे ‘निधन’…!

कर्नल नरेंद्र कुमार यांचे ‘निधन’…!

364
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : ‘सियाचीन हिरो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि ‘ऑपरेशन मेघदूत’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्नल नरेंद्र(बुल कुमार)यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी दिल्लीतील रुग्णालयात गुरुवारी पहाटे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मृदुला व प्रथम भारतीय विण्टर ऑलिम्पियन असलेली त्यांची मुलगी शैलजा कुमार असा परिवार आहे.कुमार यांचा मुलगा आणि मर्क्युरी हिमालयन एक्स्पीडिशनचे सीईओ अक्षय कुमार यांचा सप्टेंबरमध्ये(२०२०)वयाच्या ५० व्या वर्षी हृदयविकाराने मृत्यू झाला.

कर्नल नरेंद्र कुमार यांच्याविषयी थोडक्यात

कर्नल कुमार यांनी १९५० मध्ये लष्करात प्रवेश केला. १९५४ मध्ये त्यांचे कुमाऊँ रायफल्स रेजिमेंटमध्ये कमिशनिंग झाले.कुमार व त्यांच्या चमूने पीर पंजाल रांगा, हिमालय, झांस्कर, लडाख, सालटोरो, काराकोरम, अगिल अशा सात पर्वतरांगा पार करून त्यांनी सियाचेनवर पाऊल रोवले होते.त्यामुळे त्यांचे भारतीय लष्कराने सियाचेनमधील लष्करी तळाचे ‘कुमार बेस’ असे नामकरण केले.भारतीय हिमालयातील १३ सर्वोच्च शिखरांपैकी नऊ शिखरांवरील यशस्वी मोहिमा कर्नल कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here