Home औरंगाबाद अट्टल गुन्हेगाराकडून मित्राची चाकूने भोसकून हत्या ; आईसमोर शिवीगाळ केल्याचा वाद

अट्टल गुन्हेगाराकडून मित्राची चाकूने भोसकून हत्या ; आईसमोर शिवीगाळ केल्याचा वाद

4966
0

औरंगाबाद : आई समोर शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वीच वाद उकरून काढत अट्टल गुन्हेगाराने मित्राची चाकूने भोसकून हत्या केली. ही खळबळजनक घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास संजयनगर भागात घडली. मंगेश दिनकर माळोदे ( २८, रा. संजयनगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, जिन्सी पोलिसांनी मारेकरी शेख अरबाज उर्फ विशाल उर्फ भुर्या याला अटक केली आहे.

मारेकरी शेख अरबाज उर्फ विशाल उर्फ भुर्या


भुर्याचा दोन दिवसांपूर्वी मंगेशसोबत टोकाचा वाद झाला होता. त्यावेळी मंगेशने भुर्याला त्याच्या आई समोर शिविगाळ केली होती. त्यामुळे भुर्याने गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास संजयनगर कॉर्नरवर पुन्हा मंगेशसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यातून भुर्याने मंगेशच्या डाव्या हातावर, डाव्या पायाच्या मांडीवर चाक़ूने हल्ला चढवला. यात चाकुचा घाव खोलवर लागल्याने मंगेश जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला काहीजणांची तात्काळ घाटीत दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान मध्यरात्री एकच्या सुमारास मंगेशचा मृत्यू झाला. दरम्यान, जिन्सी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गोकुळ ठाकुर भुर्याला मध्यरात्री अटक केली. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिन्सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट केंद्रे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here