Home महाराष्ट्र धीरेंद्र कृष्ण शास्त्रींची मोठी घोषणा म्हणाले , देशात आणखी एक बागेश्वर धाम...

धीरेंद्र कृष्ण शास्त्रींची मोठी घोषणा म्हणाले , देशात आणखी एक बागेश्वर धाम उभारणार

307
0

देशभरात प्रसिद्ध असलेल्या बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी एक मोठी घोषणा केली आहे. छतरपूरशिवाय देशात आणखी एक बागेश्वर धाम होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा धाम मुंबईत बांधला जात आहे. २१ मार्च रोजी त्याचे भूमिपूजन झाले. धीरेंद्र शास्त्री यांच्या माहितीनुसार भूमिपूजन मुंबईतील भिवंडीमध्ये झाले आहे. दरम्यान मी सुद्धा मुंबईकर होणार असल्याची माहिती त्यांनी दिली
मागच्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेले बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री १८-१९ मार्च रोजी मुंबईत होते. यावेळी लोकांची मोठी गर्दी दिसून आली. पहिल्या दिवशी त्यांचा दिव्य दरबार तर दुसऱ्या दिवशी प्रवचन झाले.पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुढे म्हणाले की, मी तुमची एवढी काळजी घेईन की तुम्हाला कोणत्याही संकटाचा सामना करता येईल. सुखी जीवनाचे अनेक मार्गही त्यांनी लोकांना सांगितले.दरम्यान पंडित धीरेंद्र यांनी दळवी दरबारात अनेक लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. आता या कार्यक्रमाला येणार्‍यांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.बालाजीच्या नावाने नारळ बांधा आणि ‘कवन सो काज कधन जग माही, जो नही होईन तत तुम पाही’ असे १०८ वेळा म्हणा. असाही उपदेश धिरेंद्र शास्त्री यांनी दिला.लोकांनी विचारण्याआधीच ते म्हणाले की तुम्ही जगात कुठेही राहून तपस्वी बाबांचे आशीर्वाद घेऊ शकता. त्याचे सतत नामस्मरण करा, त्याचे ध्यान करा, तो सदैव तुमच्यासोबत राहील.विशेष म्हणजे बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमातही हिंदू राष्ट्राची मागणी उठली होती. असे पोस्टर्स घेऊन अनेकजण उभे असल्याचे दिसून आले. यावर धीरेंद्र यांनी त्यांचे कौतुक केले. सर्वांनी सहकार्य केल्यास भारत एक दिवस हिंदू राष्ट्र होईल, असे ते म्हणाले.नागपूर वादानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा हा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. नागपुरात त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता. अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित लोकांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here