Home क्राइम सिडको पोलिसांनी तब्ब्ल १ लाख १२,००० रु…….

सिडको पोलिसांनी तब्ब्ल १ लाख १२,००० रु…….

769
0


मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : सिडको विषेश पथकाने शटर फोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील एकुण १,१२,००० / -रु . चा मुद्देमाल दोन आरोपीतांकडुन जप्त करुन सिडको पोलिसांनी एकुण ०४ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत .जानेवारी २०२१ रोजी सकाळी ० ९ .०० वाजे पासुन सिडको विषेश पथकाचे अधिकारी व अंमलदार असे मा . पोलीस उप आयुक्त साहेब परिमंडळ -२ औरंगाबाद शहर यांचे आदेशाने शहरात मंगळसुत्र चोरी होवु नये व मंगळसुत्र चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवुन कार्यवाही करणे चालू होती.

हद्दीतील बजरंग चौक भागात पेट्रोलींग करत असतांना पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना त्यांचे खबऱ्या मार्फत माहीती मिळाली. एक संशयात यक्ती टि.व्ही . सेंटर भागातील संजय गांधी मार्कट मध्ये मोटार सायकलवर लहान पाण्याच्या मोटारी विक्री करण्यासाठी आलेले आहे. ग्राहकाची वाट पाहत आहे. अशी माहिती मिळताच संशयात व्यक्तीचा शोध सुरु केला . सताना नमुद ईसम हे एका दुकानाच्या आडोशाला मोटार सायकल ऊभी करुन त्यावर पांढऱ्या रंगाचा कागदी बॉक्स ठेवुन संशयीत रित्या उभे असतांना दिसले .तेव्हा तीन ईसम तेथुन पळुन जाण्याचा प्रयत्न करत असतांना विशेष पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी चारही बाजुने घेराव घालुन त्यांना तेथेच जागीच पकडले व त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारला.
आरोपी ची नावे
१ ) शेख सोहेल शेख इस्माईल वब २२ वर्षे , रा.बागवान गल्ली , बारापुल्ला गल्ली गरम पाणी औरंगाबाद.
२ ) सय्यद ताहील सय्यद नईम वय २० वर्षे रा . तोफखाना बाजार छावणी पो.स्टे जवळ छावणी औरंगाबाद.
३ ) विधी संघर्षग्रस्त बालक वय १७ वर्षे , असे सांगीतले .
.


त्यानंतर तेथे त्यांचे ताव्यातील मोटार सायकल व त्यावर ठेवलेल्या कागदी बॉक्स मधील दोन पाण्याच्या मोटारी पंचा समक्ष जप्त केल्या व आरोपीच्या ताब्यातील पाण्याच्या मोटारी व मो.सा. बाबत आरोपीतांकडे विचारपुस केली असता त्यांनी सदरच्या पाण्याच्या मोटारी व मो.सा. चोरीच्या असल्याचे सांगीतले त्यावरुन पो.स्टे . गुन्हे अभिलेन पडताळले असता पाण्याच्या मोटारी संदर्भात पो.स्टे सिडको येथे गु.र.नं. १८/२०२१ कलम ४६१ , ३८० भा.द.वि.प्रमाणे व मोटार सायकल बाबत पोस्टे सिडको येथे गु.र.नं. ०१/२०२१ कलम ३७ ९ भा.द.वि. प्रमाणे दाखल असल्याचे निष्पन्न झाले . त्यावरुन नमुद दोन्ही आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना पोस्टेला आणुन वि.सं.बा. याची वया बाबतची खात्री करुन त्यास नोटीस देवुन त्याचे आईच्या ताब्यात दिले व आरोपी क्र . १ व २ यांना सदर पो.स्टे सिडको येथे गु.र.नं. १८/२०२१ कलम ४६१,३८० भा.द.वि. गुन्हायात अटक करुन आरोपीने निवेदन केल्याप्रमाणे त्यांचेकडुन गुन्ह्यातील उर्वरीत पाण्याच्या मोटारी व एक कॉम्युटर मॉनीटर व पो.स्टे सिडको गु.र.नं. ०१/२०२१ कलम ३७ ९ भादवि मधिल चोरीची मोटार सायकल व औरंगाबाद शहरातील पो.स्टे . जवाहनगर , सिटी , चौक येथील चोरी केलेल्या मोटार सायकली असा एकुण १,१२,००० / -रु . किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन पो.स्टे . सिडको येथील ०२ व इतर पो.स्टे . चे ०२ असे एकूण ०४ मो.सा. चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहे . सदरची कार्यवाही मा . पोलीस आयुक्त , श्री . डॉ . निखील गुप्ता सर , मा . पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ -२ , श्री . दिपक गि – हे सर , सहाय्यक पोलीस आयुक्त सिडको विभाग श्री . निशीकांत भुजबळ सर , सिडको पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री . अशोक गिरी यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे . सिडको विषेश पथकाचे चे पोलीस उप- निरीक्षक श्री . कल्याण शेळके व पोलीस अंमलदार नरसिंग पवार , सुभाष शेवाळे , सुरेश भिसे , स्वप्नील रत्नपारखी , विशाल सोनवणे यांनी केली असुन पुढील तपास पोलीस हवालदार पोहेकॉ / १०७१ नलावडे हे करीत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here