Home वाचककट्टा वर एक ,वधू दोन ,त्याने केले दोघींशीही लग्न

वर एक ,वधू दोन ,त्याने केले दोघींशीही लग्न

436
0

छत्तीसगड : छत्तीसगडच्या बस्तरमधील एका गावात युवकाने एकाचवेळी दोन तरुणींसोबत लग्न केले. तीन जानेवारीला गावकऱ्यांच्या साक्षीने हा विवाह सोहळा पार पडला. कोणावरही जबरदस्ती न करता, एकाच मांडवात युवकाने दोन तरुणीसोबत लग्न केले. यांच्या लग्नाला कोणाचाच विरोध दिसून नाही आला. उलट सर्व गावच्या संमतीने हा विवाहसोहळा झाला.

चंदू मौर्य नावाचा तरुण याच्यावर हसिना आणि सुंदरी या दोन्ही मुलींचे प्रेम होते.आणि चंदुलाही या दोघींवर प्रेम जडले. मग काय, या पट्ठ्याने दोघींशीही लग्न करून घेतले.बस्तच्या तिकारा लोहंगा गावातील मंडपात तिघांचे लग्न झाले. “हसिना आणि सुंदरी दोघी मला आवडायच्या आणि त्यांना सुद्धा मी आवडत होतो. सर्व गावकऱ्यांसमोर सर्वसहमतीने आम्ही तिघांनी लग्न केले. माझ्या एका पत्नीचे कुटुंबीय या लग्नाला आले नाहीत” असे चंदूने सांगितले.दोन्ही वधूंचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. सोशल मीडियावर हे लग्न व्हायरल झाले आहे. सर्व गावकऱ्यांसमोर लग्न होण्याची बस्तरमधली ही पहिली घटना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here