Home औरंगाबाद भास्कर पेरे पाटील…..!

भास्कर पेरे पाटील…..!

345
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी होत आहे. औरंगाबादच्या पाटोद्यात तब्बल पंचवीस वर्ष एक हाती गावावर असलेले भास्कर पेरे-पाटलांचे वर्चस्व संपुष्टात आले असून आदर्श पाटोद्यात सत्तांतर झाल्याचे पाहायला मिळत आहे. पेरे पाटलांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यांच्या कन्या अनुराधा पेरे- पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांचा पराभव झाला आहे.
११ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीपूर्वीच आठ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. तर तीन जागांसाठी निवडणूक घेण्यात आली, यात भास्कर पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे उभ्या होत्या. त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे. अनुराधा पेरे पाटील यांच्याविरोधात उभे असलेल्या दुर्गेश खोकड यांना २०४ मते मिळाली, तर अनुराधा पेरे पाटील यांना 184 मते मिळाली. पंचवीस वर्ष सत्तेत असलेल्या पेरे पाटील यांनी पाटोदा गावाचा काया पलट झाला होता . गावाला आदर्श गाव म्हणून महाराष्ट्रभर ओळख दिली. त्याच गावात त्यांच्या मुलीला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
दरम्यान, यावर्षी पेरे पाटलांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपला पॅनल उभा केला नाही. आता पुढच्या पिढीला संधी द्यायची म्हणून आपण बाजूला झाल्याचे पेरे पाटील यांनी स्पष्ट केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here