Home अर्थकारण शेअर बाजारात आज देखील मोठी घसरण

शेअर बाजारात आज देखील मोठी घसरण

222
0

संमिश्र जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार आज सलग दुसऱ्या दिवशी दबावाखाली आहेत. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्ही प्रमुख देशांतर्गत निर्देशांकांनी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी व्यवहारात सपाट सुरुवात केली.
आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने सपाट सुरुवात केली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये थोडी वाढ झाली आहे. आशियाई बाजारांमध्ये जपानचे निक्केई आणि कोरिया कोस्पी जवळपास अर्धा टक्का घसरणीसह व्यवहार करत आहेत.
त्याचप्रमाणे अमेरिकन फ्युचर्स मार्केटमध्येही विक्री होत आहे. काल, कमकुवत जागतिक संकेतांमुळे, सेन्सेक्स 289 अंकांनी घसरून 57,925 वर बंद झाला आणि निफ्टी 75 अंकांनी घसरून 17,076 वर बंद झाला. बँकिंग आणि आयटी शेअर्स विक्रीत आघाडीवर होते.
एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा, इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रो हे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. तर एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि आयशर मोटर्स हे शेअर्स निफ्टी घसरले.सुरुवातीच्या व्यापारात, बीएसई सेन्सेक्सवर एचसीएल टेकचे शेअर्स 1.64 टक्के, इन्फोसिस 1.56 टक्के, टेक महिंद्रा 1.30 टक्के, टीसीएस 1.26 टक्के, विप्रो 1.08 टक्के, आयटीसी 0.53 टक्के, मारुती 4.4 टक्के वाढले. अँड टुब्रो 0.36 टक्के, कोटक महिंद्रा बँक 0.24 टक्के, अॅक्सिस बँक 0.21 टक्के, भारती एअरटेल 0.14 टक्के आणि एनटीपीसी 0.11टक्क्यांनी वधारत होते.सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्सची सर्वात मोठी 0.88 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे बजाज फिनसर्व्ह, टायटन, एचडीएफसी, रिलायन्स, टाटा स्टील, महिंद्रा आणि महिंद्रा, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, एचडीएफसी बँक, पॉवरग्रीड आणि सन फार्मा लाल रंगात व्यवहार करत होते. .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here