Home इतर फक्त तीन महिन्यांत तिने केली ७६ मुलांची सुटका…!

फक्त तीन महिन्यांत तिने केली ७६ मुलांची सुटका…!

811
0

मराठवाडा साथी न्यूज

नवीदिल्ली : नवीदिल्ली येथील सीमा ढाका (वय ३३) या महिला हेड कॉन्स्टेबलने फक्त तीन महिन्यांत ७६ बेपत्ता लहान मुलांचा शोध घेतला . या कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्यांचा ‘ऑऊट ऑफ टर्न प्रमोशन’ देऊन गौरव करण्यात आला आहे. फक्त तीन महिन्यांत ‘विशेष पदोन्नती’ मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला पोलीस कर्मचारी ठरल्या आहेत. त्यांनी फक्त या मुलांना शोधूनच नाही काढले तर त्यांच्या कुटुंबाशी देखील त्यांची भेट करून दिली आहे.

सीमा धक्का यांना ‘ऑऊट ऑफ टर्न प्रमोशन’ देऊन गौरव करण्यात आल्यानंतर त्या म्हणाल्या की – ‘मी दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा आणि पंजाब या राज्यातील मुलांना शोधून काढले आहे. बऱ्याच काळापासून अशा प्रकरणांवर मी काम करत आहे. आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासाठी प्रोत्साहित केले. एक आई या नात्याने तिला कधीच वाटणार नाही की तिचं मूल तिच्यापासून दूर जावं. त्यामुळेच मुलांना वाचवण्यासाठी मी झपाटलेल्यासारखी २४ – २४ तास काम केले’.

‘आऊट ऑफ टर्न प्रमोशन’ या प्रोत्साहन योजनेच्या निकषांपेक्षा सीमा ढाका यांची कामगिरी अतिउत्कृष्ट ठरली.’समयपूर बादली’ पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणाऱ्या हेड कॉन्स्टेबल ‘सीमा ढाका’ यांनी तीन महिन्यांहून कमी काळात ७६ मुलांना वाचवले.त्यांनी सुटका केलेल्या ७६ मुलांपैकी ५६ मुलांचे वय हे ‘७ ते १२ वर्षे’ आहे.सीमा ढाका यांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल हेड कॉन्स्टेबल वरून त्यांची सहाय्यक पोलीस निरिक्षक म्हणून वर्णी लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here