Home महाराष्ट्र तुम्ही कोरोनाच्या ‘रिस्क झोन’मध्ये आहात का?

तुम्ही कोरोनाच्या ‘रिस्क झोन’मध्ये आहात का?

14551
0

मुंबई : कोरोना रुग्णसंख्येने कोरोनाचा इतका संसर्ग का पसरत आहे किंवा इतके रुग्ण का वाढत आहेत, त्याच्या कारणांची एक यादी केंद्र सरकारने प्रसिद्ध केली आहे. धुम्रपान, हृदय आणि श्वसनासंबंधित आजार कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्यासाठी जास्त धोकादायक असल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या बचावासाठी ही यादी उपयुक्त ठरेल असा विश्वास सरकारला आहे.

वय 60 पेक्षा जास्त आहे?
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार, वृद्ध व्यक्ती ज्यांचे वय 60 पेक्षा जास्त आहे, त्यांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. अशा व्यक्तींसाठी कोरोनाकाळात खबरदारी घेणे आवश्यक आहे.

धुम्रपान करणाऱ्यांना जास्त धोका
जागतिक आरोग्य संघटना WHO च्या मते, तंबाखू सेवनामुळे कोव्हिड 19 संसर्गाचा धोका वाढू शकतो. सध्या SARS-CoV-2 संसर्ग आणि धुम्रपान यामध्ये होणारे धोके जास्त आहेत. जानेवारी महिन्यात लंडनमधील रिसर्चनुसार, जे कोरोना रुग्ण सध्या रुग्णालयात दाखल आहेत त्यामध्ये धुम्रपान करणाऱ्यांची संख्या अधिक आहेत. म्हणजेच जे धुम्रपान करतात त्यांना संसर्ग लगेच होतो असा त्याचा अर्थ काढता येईल.

कोरोनामध्ये मधुमेह रुग्णांचा सर्वाधिक मृत्यू
ज्या रुग्णांना मधुमेह किंवा डायबेटिज आहे, अशा रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहेच, पण गंभीर लक्षणे आणि मृत्यू होण्याचे प्रमाण तीनपट आहे.

हृदयरोग, कॅन्सरसारखे आजार
हृदयरोग, कॅन्सरसारखे आजार असणाऱ्या रुग्णांनाही कोरोनाचा जास्त धोका आहे. हृदयरोग, कॅन्सरसारखे आजार एकापासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्गाने होत नाही. मात्र हे आजार गंभीर स्वरुपाचे असल्याने, अशा रुग्णांना कोरोना झाल्यानंतर धोका अधिक वाढतो, असे WHO चे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here