मराठवाडा साथी न्यूज
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावाचे शिवसेना शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून रिव्हॉल्व्हरने दीपक म्हात्रे यांच्यावर ३ वेळा गोळीबार करण्यात आला आहे.मात्र, सुदैवाने म्हात्रे यांनी गोळ्या चुकवल्याने त्यांना एकही गोळी लागली नसून ते सुखरूप आहेत. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
म्हात्रे यांच्यावर सुरू असलेल्या वादातून गोळीबार झाल्याची चर्चेला उधाण आले आहे.म्हात्रे हे पत्नीसह ठाण्याहून घरी आल्यानंतर घरासमोरील परिसरात आपली गाडी पार्क करत असतांना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला.मात्र,म्हात्रे यांनी गोळी चुकवत पत्नीलाही वाचविले.दरम्यान,हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.