मराठवाडा साथी न्यूज
गोरखपूर : एका मंडपात दोन बहिणींचे अथवा दोन भावांचे लग्न होत असतात.मात्र, मुलीच्या लग्नात आईनेही लग्न केल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये सामुदायिक विवाह सोहळ्यात आईने अगोदर मुलीचे कन्यादान केले आणि नंतर स्वत: सप्तपदी घेतली. अगदी उत्साहात हे लग्न पार पडले.या आगळ्यावेगळ्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली दिसत आहे.
नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार,गोरखपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका सामूहिक विवाह सोहळ्यात ६३ जोडप्यांचे लग्न लागणार होते.ज्यामध्ये पिपरॉलीच्या बेला देवी यांच्या इंदू नावाच्या मुलीचे सुद्धा लग्न ठरले होते.या विवाहसोहळ्यात बेला देवी यांनी सर्वप्रथम मुलीचे लग्न लावले आणि त्यानंतर बेला नवरी बनून आल्या आणि त्याच मांडवात त्यांनीही लग्न केले.
दरम्यान,२५ वर्षांपूर्वी बेला देवी यांच्या पतीचे निधन झाले होते.त्यांच्या पश्चात ब्राला यांनी २ मुले आणि ३ मुलींचा सांभाळ केला व त्यांची लग्नही लावून दिली.हा विवाह त्यांच्या सर्वात लहान मुलीचा होता.त्यामुळे पुढील आयुष्य जगण्यासाठी जोडीदार निवडण्याचा निर्णय घेत बेला देवी यांनी त्यांच्या ५५ वर्षीय दीर जगदीश यांच्यासोबत त्यांनी लग्न केले.