मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : लवकरच उत्तर प्रदेशमध्येही फिल्म सिटी बनविण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.या फिल्म सिटी च्या निर्मितीसाठी योगी यांच्या सरकारने नोएडामध्ये जागा दिली असून बांधकाम वेगाने चालू आहे. या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईमध्ये काही अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांची भेट घेणार आहेत.फक्त एव्हढेच नाही तर उत्तर प्रदेशमध्ये उभारण्यात येणारी फिल्म सिटी मुंबईहून मागे राहू नये, यासाठी मुख्यमंत्री योगी हे मुंबईतील मोठ्या चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांच्या संपर्कात ते आहेत.
दरम्यान,यूपीमधील प्रस्तावित फिल्म सिटी संदर्भात मुख्यमंत्री आज बॉलिवूडमधील दिग्गजांशी बैठकीत चर्चा करणार आहेत. या बैठकीत ते यूपीमध्ये फिल्म सिटी बनवण्याच्या योजनांविषयी फिल्मी जगातील मान्यवरांशी चर्चा करणार आहेत.