Home इतर अभिजीत बिचुकले यांचे नाव मतदार यादीतून ‘गायब’…!

अभिजीत बिचुकले यांचे नाव मतदार यादीतून ‘गायब’…!

609
0

मराठवाडा साथी न्यूज

सातारा : ‘बिग बॉस’ फेम ‘अभिजीत बिचुकले’ पुणे पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. मात्र,बिचुकले यांचे नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर गोंधळ उडाला आहे. मतदार यादीमध्ये बिचकुले यांच्या पत्नीचे नाव आहे पण त्यांचं स्वतःच नाव नाही. यावरुन संताप व्यक्त करत त्यांनी थेट निवडणूक आयोगावरच टीका केली आहे.मी स्वत: उमेदवार असून माझे नाव मतदार यादीत नाही., हे असं असेल तर सामान्यांचे काय? असा प्रश्न विचारत त्यांनी थेट निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

दरम्यान, विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होतं आहेत. या निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here