Home औरंगाबाद दिल्लीच्या रेल्वे भवनात नौकरीचे अमिश दाखवून फसवणूक, राज्यात मोठे रॅकेट सक्रिय

दिल्लीच्या रेल्वे भवनात नौकरीचे अमिश दाखवून फसवणूक, राज्यात मोठे रॅकेट सक्रिय

3098
0

औरंगाबाद : रेल्वे खात्यामध्ये तिकीट तपासणीस पदाची (टी.सी.) नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दाखवून पदाची बनावट नियुक्तीपत्रे देऊन एका भामट्याने तिघांची १६ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  तिघांची तब्बल १६ लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या भामट्याने राज्यातील अनेक बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून गंडविल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अनिकेत कैलास कोकाटे (रा. देसवंडी, ता. राहुरी, जि. अहमदनगर) याच्याविरुध्द सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत नवनाथ खेडकर (३२, रा. शनी मंदीरामागे, नवजीवन कॉलनी, एन-११, हडको, मुळ रा. वडाची वाडी, पो. तिंतरवणी, ता. शिरूर कासार, जि. बीड) एका उर्दु शाळेत शिपाई पदावर गेल्या पंधरा वर्षापासून नोकरी करत आहेत. याची जुलै २०१८ मध्ये पुणे ते औरंगाबादच्या बस प्रवासात अनिकेत कोकाटे याच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी कोकाटेने दिल्लीतील रेल्वे भवनात नोकरीला असून, तेथे तिकीट तपासणीस पदाच्या जागा आमच्या कोट्यातून भरल्या जात आहेत. तेव्हा कोणाला नोकरी लावायची असेल तर सांगा असे म्हणाला. त्यावरुन खेडकर यांनी नातेवाईक विशाल तुकाराम ताठे व सुनील विठ्ठल नागरे (दोघेही रा. घाटनांद्रा, ता. सिल्लोड) यांच्याशी संपर्क साधून नोकरीसंदर्भात माहिती दिली. पुढे दोनच दिवसांनी कोकाटेने औरंगाबादला आला. खेडकरच्या घरी गेल्यावर त्याने ताठे व नागरे यांच्याकडे शैक्षणिक कागदपत्रांची विचारपूस व मागणी केली. यावेळी त्याने नोकरीसाठी प्रत्येकी दहा लाख रुपये लागतील असे सांगितले. मात्र, तडजोडीअंती प्रत्येकी आठ लाख देण्याचे ठरले.

आगाऊ रकमेची मागणी…….

यावेळी कोकाटे याने नोकरीसाठी आगाऊ रक्कम द्यावी लागेल. तरच समोरचा व्यक्ती नोकरीचे काम हातात घेईल. तसेच आठ दिवसात नोकरीचे काम होई असे आश्वासनही कोकाटे याने दिले. तसेच नोकरीच्या कामासाठी दहा लाख तयार ठेवा. दोघांपैकी एकाला दिल्लीला घेऊन जातो असेही कोकाटे म्हणाला. पैशांची जुळवाजुळव होत नसल्याने सप्टेंबर २०१९ मध्ये प्रत्येकी ०३ लाखप्रमाणे सहा लाख तर खेडकर यांनी स्वत: जवळील अडीच लाख असे एकुण साडेनऊ लाख रुपये कोकाटेला दिले………

दिल्लीत बनावट नियुक्तपत्र दिले


आगाऊ रक्कम म्हणून साडेनऊ लाख रुपये घेतल्यानंतर कोकाटेने ताठे याला विमानाने दिल्लीतील रेल्वे भवनला बोलावून घेतले. त्यानुसार, १६ सप्टेंबर २०१९ रोजी ताठे त्याचे भावजी गोविंद ईप्पर असे दोघे विमानाने दिल्लीला गेले. दोन दिवसांनी ताठेला वैद्यकीय तपासणीसाठी सोबत नेले. त्यावेळी कोकाटे याने वैद्यकीय अहवाल आल्यावर नियुक्तीपत्र मिळेल असे सांगितले. त्यामुळे ताठे व त्याचे भावजी ईप्पर हे दिल्लीतील लॉजवरच थांबले. चार दिवसांनी कोकाटे पुन्हा दोघे थांबलेल्या लॉजवर गेला. त्याने २० सप्टेंबर २०१९ रोजी रेल्वेत नोकरी लागल्याचे नियुक्तीपत्र दिले………..

टप्प्या-टप्प्याने उकळली रक्कम…….


ताठेला नियुक्तीपत्र दिल्यानंतर कोकाटेने उर्वरीत पैशांची मागणी केली. त्यामुळे त्याच्या बँक खात्यात २१ सप्टेंबर २०१९ रोजी दोन लाख रुपये टाकण्यात आले. त्यानंतर लगेच दोन दिवसांनी म्हणजे २४ सप्टेंबर २०१९ रोजी नागरेला देखील विमानाने दिल्लीला बोलावून घेतले. त्याची देखील शैक्षणिक कागदपत्रे घेऊन रेल्वे भवनात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याला ३० सप्टेंबर २०१९ रोजी रेल्वेमध्ये  नोकरी लागल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले. त्याच्या नियुक्तीपत्रात ४ नोव्हेंबर २०१९ रोजी नोकरीवर रूजू होण्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कोकाटेने पुन्हा उर्वरीत पैशांची मागणी केल्यामुळे ३० सप्टेंबर २०१९ रोजी खेडकर यांनी दीड लाख रुपये त्याच्या बँक खात्यात जमा केले. तसेच गुगल पेवरुन ५० हजार रुपये पाठवले……..दिल्लीत ठेवले ताटकळत अन झाला भांडाफोड ताठेने नोकरीवर रूजू होण्याकरिता १० आॅक्टोबर २०१९ रोजी कोकाटेला फोन केला. तेव्हा त्याने सांगितले की, सध्या मोठे साहेब  सुट्टीवर आहेत. तू चार ते पाच दिवसांनी ये. म्हणून ताठेने १५ आॅक्टोबर रोजी विमानाने दिल्ली गाठली. तेथे कोकाटेशी भेट झाल्यावर त्याने मोठे साहेब दौ-यावर आहेत. त्यामुळे थांबावे लागेल असे म्हणत ताठेकडून मुळ नियुक्तीपत्र परत घेतले. ताठेला दिल्लीत दहा ते पंधरा दिवस ताटकळत ठेवले. दिवाळसण असल्याने ताठे पुन्हा औरंगाबादला आला. दिवाळी झाल्यावर नागरेची नियुक्ती होती. त्यामुळे त्याने देखील कोकाटेशी फोनवर संपर्क साधला. तेव्हा त्याला ४ नोव्हेंबरला नियुक्ती असली तरी एका महिन्याच्या आत कधीही रूजू होऊ शकता असे सांगितले. त्यामुळे ताठे आणि नागरे एक आठवड्यानंतर दिल्लीला पोहोचले. यावेळी देखील दोघेही दहा ते पंधरा दिवस दिल्लीत थांबले. तेव्हा कोकाटे त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याने दोघांना त्याच्या उत्तमनगर पुर्व, जनकपुरी, दिल्लीतील फ्लॅटवर थांबवले. दोघेही त्याच्याकडे नियुक्तीपत्र व रूजू होण्याची मागणी करु लागले. परंतू, कोकाटे टाळाटाळ करत होता. आणखी पैशांची मागणी केल्याने त्याला दोन टप्प्यात पुन्हा दोन लाख रुपये देण्यात आले. पुढे दोघेही दिल्लीत आजारी पडले. मात्र, दोघांनाही नोकरीवर रूजू करण्यात आले नाही. म्हणून ते औरंगाबाद परतले. अखेर फसवणूक झाल्याचे उघड झाल्याने कोकाटेकडे पैशांची मागणी करण्यात आली. मात्र, त्याने पैसे अथवा नोकरीवर रूजू करुन घेतले नाही. त्यावरुन खेडकर यांनी सिडको पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक प्रविण पाटील करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here