Home औरंगाबाद कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरचा बलात्काराचा प्रयत्न

कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरचा बलात्काराचा प्रयत्न

2778
0

औरंगाबाद : महापालिकेच्या पदमपुरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये आयुष डॉक्टरने मंगळवारी मध्यरात्री पॉझिटिव्ह महिला रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न
केल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. महिला रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी सेंटरमध्ये शिरून डॉक्टरला चांगलंच चोप दिला. याप्रकरणी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी त्या डॉक्टरला बडतर्फ केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापालिकेने कोरोनाबाधितांवर उपचारासाठी पदमपुरा येथे केंद्र आहे. केंद्रात दोन दिवसांपूर्वी एक महिला रुग्ण दाखल झाली. एका आयुष्य डॉक्टरने त्या महिलेचा मोबाईल क्रमांक घेऊन तिला सतत फोन करत होता. मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास त्या डॉक्टरने महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिला गच्चीवर नेऊ लागला. त्यावेळी त्या महिलेने विरोध करत आरडाओरड सुरु केली. महिलेची आरडोओरड ऐकून कोविड केअर सेंटरमध्ये गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांनी धाव घेत महिलेला सोडवले. या प्रकारामुळे पीडित महिला प्रचंड भेदरली होती. ती रुग्णालयातच रडत होती. या प्रकारची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांनी रुग्णालयात शिरून त्या डॉक्टरला चांगलाच कोप दिला. या प्रकरणी मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, रुग्णालयाच्या डॉ. उज्वला भामरे यांनी या प्रकारावर बोलणे टाळले. हा प्रकार बुधवारी मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांना कळला. त्यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल गुरुवारी सकाळपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्या डॉक्टरला प्रशासकांनी बडतर्फ केल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे याबाबत पोलिसात अद्याप तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याचे कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here