Home महाराष्ट्र प्रत्येकी पाच लाखांची मदत : टोपे

प्रत्येकी पाच लाखांची मदत : टोपे

77
0

मराठवाडा साथी न्यूज
भंडारा :भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे. राज्य सरकारकडून दुर्घटनेतील पिडीत कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून, यात कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील राजेश टोपे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here