Home नवी दिल्ली महिलेचा भयानक पराक्रम,सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

महिलेचा भयानक पराक्रम,सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

268
0

नवी दिल्ली :सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेकदा लोक काहीही करायला तयार असतात.तुम्ही अनेक लोकांना विचित्र पराक्रम करताना पाहिले असेल. लोकांचे अनेक निरनिराळे व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसून येतात. अशातच एका महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे.महिलेचा भयानक पराक्रम पाहून तुम्हीदेखील शॉक व्हाल.सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दोन महिला स्टेजवर उभ्या असलेल्या दिसत आहेत.एक जरा उंच उभा आहे आणि दुसर्‍या महिलेचे डोके धरून आहे.मग ती हळू हळू त्याचे शरीर फिरवू लागते.मात्र तिचं डोकं एकाच जाग्यावर स्तब्ध आहे.दुस-या महिलेच्या चेह-यावरून असे दिसते की तिला वेदना होत आहेत. महिलेचं हे अनोखं टॅलेंट पाहून तुम्हीलादेखील धक्का बसेल.@uncensoredpromo या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांना थक्क करत आहे. व्हिडीओवर खूप सारे लाईक्स आणि कमेंटही पहायला मिळत आहे.दरम्यान, या व्हिडिओला 27 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकाने सांगितले की ती भुतासारखी दिसते. त्याच वेळी, बरेच लोक हे पाहून थक्क झाले. एकाने चुकूनही घरी असे करू नये असे सांगितले. एकाने सांगितले की, हे दृश्य पाहून तो खूप घाबरला.अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होतात .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here