Home इतर ‘अन्नात्थे’ चे शूटिंग पुन्हा सुरु…!

‘अन्नात्थे’ चे शूटिंग पुन्हा सुरु…!

548
0

मराठवाडा साथी न्यूज

हैदराबाद : सुपरस्टार रजनीकांतच्या ‘अन्नात्थे’ चित्रपटचे शूटिंग पुन्हा एकदा सुरु झाले आहे.या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेत्री नयनतारा देखील हैद्राबादला पोहचली आहे.सन पिक्चर्स या चित्रपटाची निर्मीती करणार असून,चित्रपटामध्ये किर्ती सुरेश, खुशबू, जॅकी श्रॉफ,मीना आणि प्रकाश राज हे देखील प्रमुख भूमिकेत असतील.

सन पिक्चर्सने आपल्या ट्विटर हॅन्डलवर काही फोटो शेअर केले आहेत.यामध्ये रजनीकांत पांढरा कुर्ता आणि पायजम्यात दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोत तो आपल्या चाहत्यांना अभिवादन करताना दिसतोय. हे फोटो शेअर करताना त्याखाली ‘सुपरस्टार रजनीकांत आपल्या अन्नात्थे या चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबाद साठी रवाना होत आहे’ असे लिहण्यात आले आहे.

दरम्यान,चित्रपटाच्या शूटिंगला फेब्रुवारीत सुरुवात झाली होती.मात्र,कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे शूटिंग थांबविण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here