Home इतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन…!

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन…!

67
0

मराठवाडा साथी न्यूज

सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोबतच माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले आहे.आज(४ जाने.) दुपारी कराड तालुक्यातील उंडाळे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

विलासकाका उंडाळकर यांच्या विषयी थोडक्यात

१९६२ मध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून विलासकाका यांनी राजकारणात प्रवेश केला होता.विलासकाका यांनी ३५ वर्षे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.त्यांनी राजकीय कारकीर्दीत त्यांनी विविध खात्यांचे मंत्रिपद सांभाळले होते. कराड दक्षिण मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व करत असताना त्यांना सहकार, दुग्धविकास, पशुसंवर्धन, मदत व पुनर्वसन खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here