Home मनोरंजन ‘बालिका वधू’ फेम अविका पडली प्रेमात

‘बालिका वधू’ फेम अविका पडली प्रेमात

1201
0

मराठवाडा साठी न्यूज

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हिंदी टीव्ही सृष्टीतील अभिनेत्री अविका गौर फार चर्चेत आहे. ‘बालिका वधू’फेम अभिनेत्री अविका गौर हिनं चाहत्यांसाठी आनंदाची बातमी शेर केली आहे. एक खास पोस्ट शेअर करत अविकाने तिच्या आयुष्यातील एक महत्वाच्या आणि खास व्यक्तीची सर्वांना ओळख करून दिली आहे. अविकानं ती प्रेमात असल्याचे या खास पोस्टमध्ये म्हटले आहे.अविकानं बॉयफ्रेंडसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.इंस्टाग्राम वर अविकाने आपल्या बॉयफ्रेंड सोबत चे रोमँटिक फोटो शेअर केले आहे.

मिलिंद चंदवानी असं अविकाच्या प्रियकराचं नाव आहे.रोडीज या शो मधून मिलिंद प्रसिद्धीस आला होता. सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही त्याची ओळख आहे. अविका आणि मिलिंद यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा देखील अविकानं शेअर केला आहे. एका एनजीओच्या वर्कशॉप दरम्यान दोघांची भेट झाली होती.

https://www.instagram.com/p/CHc25dIAidq/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here