Home इतर खवले मांजरांना मिळणार ‘संरक्षण’…!

खवले मांजरांना मिळणार ‘संरक्षण’…!

330
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : खवले मांजर ही महत्त्वाची प्रजाती असून ती वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत अनुसूची मध्ये समाविष्ट आहे.पण विविध कारणांमुळे या प्रजातीच्या जगण्यास धोका निर्माण होत आहे.मात्र,आता राज्यातील खवले मांजरांना आता संरक्षण मिळणार आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनी या प्रजातीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले होते.यामुळे या मांजरांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी भ्यासगट तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.निर्देशानुसार पुण्याचे वनसंरक्षक रमेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाने अभ्यासगट स्थापन केला आहे. हा अभ्यासगट खवले मांजरांच्या संवर्धनासाठीचा कृती आराखडा तयार करून सरकारला सादर करणार आहे.

खवले मांजरीचे अधिवास व्यवस्थापन, गुन्हेगारीवर आळा घालणे,गुप्त माहिती मिळवणे,जनजागृती करणे,खवले मांजरासाठी संरक्षण आणि संवर्धनाचा कृती आराखडा तयार करणे इत्यादी अभ्यासगटाचे मुख्य हेतू आहेत.

दरम्यान,या अभ्यासगटात दीपक खाडे (उपवनसंरक्षक, चिपळूण-रत्नागिरी),विश्वास काटदरे (सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ),डॉ.वरद बी गिरी(संस्थापक-संचालक, एनआयडीयूएस), नितीन देसाई (संचालक, सेंट्रल इंडिया वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया), रोहन भाटे (माजी मानद वन्यजीव रक्षक, सातारा) यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला असून डॉ. बी. एस. हाडा(उपवनसंरक्षक) हे सदस्य सचिव असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here