Home मनोरंजन ‘हिंमत असेल तर अडवून दाखवा’ – आमदार राम कदम

‘हिंमत असेल तर अडवून दाखवा’ – आमदार राम कदम

285
0

मुंबई : रिपल्बिक टीव्हीचे मालक, संपादक अर्णब गोस्वामी यांना भेटण्यासाठी भाजपचे आमदार राम कदम हे तळोजा कारागृहाकडे रवाना झाले आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले ‘रिपब्लिक टीव्ही’चे मालक, संपादक अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलविण्यात आल्यानंतर भाजप अधिकच आक्रमक झाला आहे. अर्णब यांची तात्काळ सुटका करा, अशी मागणी भाजपचे नेते करत आहेत. भाजपचे आमदार राम कदम हे अर्णबल भेटण्यासाठी निघाले असून हिंमत असेल तर अडवून दाखवा, असे आव्हान त्यांनी ठाकरे सरकारला केले आहे.

राम कदम यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ‘अर्णब यांच्या जिवाला धोका आहे,’ असा आरोप कदम यांनी केला आहे. ‘अर्णब यांच्या केसालाही धक्का लागला तर त्यासाठी महाविकास आघाडी सरकार जबाबदार असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना देशातील जनता कधीच माफ करणार नाही. त्यांनी बळजबरीनं राज्यावर आणीबाणी लादली आहे,’ असंही कदम यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. ‘अर्णब यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, महाराष्ट्र सरकार बरखास्त करा,’ अशी मागणीही कदम यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here