Home नांदेड जेव्हा नांदेड उत्तरचे आमदार व विशेष पोलीस महानिरीक्षक वाहतूक सुरळीत करतात….!!

जेव्हा नांदेड उत्तरचे आमदार व विशेष पोलीस महानिरीक्षक वाहतूक सुरळीत करतात….!!

621
0

नांदेड : शहरातील सर्वच भागात सकाळच्या व सायंकाळच्या सुमारास वाहतुकीची समस्या उद्भवत आहे. अशाच प्रकारे आज सायंकाळच्या सुमारास तरोडा नाका परिसरातील कॅनॉल रोड चौकात वाहतूक विस्कळीत झाली होती. तेव्हा नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. निसार तांबोळी व आ. बालाजी कल्याणकर यांनी गाडीतून खाली उतरत वाहतूक सुरळीत केली. यावेळी सर्वच वाहनधारक अवाक् झाले.

        अलीकडच्या काळात सर्वान जवळच वाहने झाली आहेत. रस्ते अरुंद असल्यामुळे वाहतुकीची समस्या दिवसागणिक वाढत आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. निसार तांबोळी हे आपला नियोजित दौरा आटपुन कार्यालयाकडे जात होते. त्यांच्या पाठीमागेच नांदेड उत्तर चे लोकप्रिय आ. बालाजी कल्याणकर हे देखील आपल्या नियोजित कार्यक्रमास मालेगाव रोड ने जात होते. त्यावेळी त्यांना तरोडा नाका परिसरातील कॅनॉल रोड चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे निदर्शनास आले. श्री. निसार तांबोळी व आ. बालाजी कल्याणकर यांनी आपल्या गाडीतून उतरत, चौकातील वाहतूक सुरळीत केली. यावेळी आजूबाजूचे बरेच तरुण देखील वाहतूक सुरळीत करण्यास मदत करीत होते. आमदार बालाजी कल्याणकर यांनी यावेळी श्री निसार तांबोळी यांचा कडे  या परिसरात  पोलिसांची  गस्त वाढवण्याची मागणी मागणी केली. त्याबरोबरच  चौकात सिग्नल उभा करून  कायमचाच वाहतूक प्रश्न  मीठवण्याबाबत सूचना देखील केल्या आहेत. काही वाहन चालकांनी या घटनेची चित्रफीत केली आहे. त्या बरोबरच काही जणांनी सोशल माध्यमांवर या घटनेचे छायाचित्रे देखील टाकले आहे. आ. बालाजी कल्याणकर हे आपल्या स्वभावाप्रमाणे नेहमीच कोणत्याही समस्येला आणि ते कोणाच्या ही मदतीला धावून जाणारे असल्याची चर्चा घटनास्थळी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here