Home वाचककट्टा डॉ. आंबेडकरांचं बौद्धिक चरित्र

डॉ. आंबेडकरांचं बौद्धिक चरित्र

180
0

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनेक चरित्रग्रंथ प्रकाशित झाले, त्यांपैकी अनेक त्यांचा बौद्धिक आवाका दाखवून देणारे आहेतच. पण चरित्राच्या तपशिलांऐवजी या बौद्धिक बाजूचा अभ्यास करण्याकडे कल असलेली दोन पुस्तकं गेल्या वर्षभरात (दोन्ही २०२२ च्या महापरिनिर्वाणदिनी) आली. तिसरं पुस्तक पुढल्या शुक्रवारी- जयंतीला प्रकाशित होतं आहे. त्या दिवशी, या पुस्तकाचे लेखक स्कॉट आर. स्ट्राउड हे मुंबईच्या टाटा समाजविज्ञान संस्थेत पुस्तकाबद्दल बोलण्यासाठी येत आहेत.

‘जॉन डय़ूई आणि डॉ. आंबेडकर’ हा टेक्सासच्या विद्यापीठात शिकवणाऱ्या स्ट्राउड यांच्या विशेष अभ्यासाचा विषय होता, तो पुढे नेऊन ‘डॉ. आंबेडकर हे भारतातल्या बुद्धिप्रामाण्याधारित वास्तववादाचे (प्रॅग्मॅटिझम) जनक ठरतात’ असा निष्कर्ष त्यांनी या पुस्तकात मांडला आहे. याआधीच्या दोन पुस्तकांपैकी ‘आंबेडकर इन लंडन’ हे संपादित पुस्तक, डॉ. बाबासाहेबांच्या ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधल्या दिवसांचा आढावा घेतं, तर शशी थरूर यांचं ‘आंबेडकर : अ लाइफ’ हे पुस्तक नवख्या वाचकांना आंबेडकरांची वैचारिक ओळख करून देतं.

‘अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट’मध्ये जातिव्यवस्थेची भलामण ‘सामाजिक श्रमविभागणी’ अशी करणाऱ्यांना ‘ही श्रमिकांचीसुद्धा विभागणी आहे’ असे उत्तर देण्यातून अथवा अन्य उदाहरणांतून डॉ. आंबेडकरांचा प्रॅग्मॅटिझम दिसून येतो, अशी मांडणी यापूर्वी (२०१९) स्ट्राउड यांनी केलेली आहे. पुस्तकात आंबेडकर यांच्या चरित्र-तपशिलांचा अन्वयार्थ कदाचित नव्यानं लावलेला दिसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here