Home मनोरंजन शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत

शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत

369
0

अमिताभ बच्चन यांना शूटिंगदरम्यान दुखापत झाली असून आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
अमिताभ बच्चन यांना ‘प्रोजेक्ट के’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत झाली. त्यानंतर लगेचच त्यांना मुंबईला आणण्यात आले. ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांना माहिती दिली होती. आता पुन्हा एकदा ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांना प्रकृतीसंदर्भात माहिती दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी लिहिलं आहे,”गंभीर दुखापत झाल्यानंतर चिंता व्यक्त करणाऱ्या सर्व चाहत्यांचे खूप खूप आभार. प्रकृतीत सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरं व्हायला थोडा वेळ लागेल. डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करण्याचा मी प्रयत्न करत आहे. आराम करत आहे. बरगड्यांना इजा झाल्याने छातीवर पट्ट्या लावल्या आहेत. डॉक्टरांनी सांगितल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात करेन…सर्वांचे खूप खूप आभार”.

मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा ‘प्रोजेक्ट के’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली. त्यांच्या बरगड्यांना गंभीर इजा झाली. हैदराबादमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर लगेचच त्यांना मुंबईला आणण्यात आले. सध्या ‘जलसा’ या त्यांच्या निवासस्थानी ते आराम करत असून ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत.

‘प्रोजेक्ट के’ या सिनेमाआधी अनेक सिनेमांच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले आहे. काही वर्षांपूर्वी ‘TE3N’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ यांच्या बरगड्यांना गंभीर इजा झाली होती. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या शूटिंगदम्यान अमिताभ यांच्या पायाची नस कापली गेली होती. ‘मेजर साब’ आणि ‘पीकू’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ यांना दुखापत झाली होती. तसेच ‘कुली’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानदेखील त्यांना गंभीर दुखापत झाली होती.

‘प्रोजेक्ट के’ या बहुचर्चित सिनेमात अमिताभ बच्चन , प्रभास आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहेत. तगडी स्टार कास्ट असलेल्या या सिनेमाची सिनेप्रेमींना चांगलीच उत्सुकता आहे. हा सिनेमा १२ जानेवारी २०२४4 रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here