Home मनोरंजन सेबीच्या बंदीनंतर अभिनेता अर्शद वारसीचे ट्विट

सेबीच्या बंदीनंतर अभिनेता अर्शद वारसीचे ट्विट

421
0

                          अर्शद वारसी व त्याच्या पत्नीलाही दणका                

बाजार नियामक सेबीने बंदी घातल्यानंतर अभिनेता अर्शद अर्शदने ट्विटरवर लोकांना विनंती केली की, ”त्यांनी ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. त्याला आणि त्याची पत्नी मारिया गोरेटी यांना शेअर बाजाराबद्दल काहीही माहिती नाही.”त्‍याने ट्विट केले आहे की, ”कृपया तुम्ही जी काही बातमी वाचत आहात त्यावर विश्‍वास ठेवू नका. मारिया आणि मला शेअर्सचे काहीही माहिती नाही.सल्ला घेतल्यानंतर शारदामध्ये गुंतवणूक केली आणि अनेकांप्रमाणे आम्हीही आमचे कष्टाचे पैसे गमावले.”अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरेटी आणि इतरांवर युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करून दोन कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत हेराफेरी केल्याचा आरोप आहे.अर्शदसह ४५ जणांवर बंदी घालण्यात आली आहे , जुलै २०२२ च्या दुसऱ्या पंधरवड्यात, ‘द अॅडव्हायझर’ आणि ‘मनीवाइज’ या दोन युट्यूब चॅनेलवर साधनाविषयी खोटे आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ अपलोड करण्यात आले.या व्हिडिओंनंतर साधनाच्या शेअरच्या किंमतीत आणि व्हॉल्यूममध्ये मोठी झेप घेतली होती. साधना ब्रॉडकास्ट अदानी समूहाला विकला जाईल असा दिशाभूल करणारा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. यूट्यूब चॅनलवर दिशाभूल करणारे व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सेबीने बेकायदेशीरपणे कमावलेले ५४ कोटी रुपये जप्त करण्याचे आदेशही दिले आहेत.पुढील आदेशापर्यंत त्यांची कोणतीही मालमत्ता विकू नये, असेही त्यांना सांगण्यात आले आहे. दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओनंतर दोन्ही कंपन्यांच्या शेअरधारकांची संख्या अचानक वाढली.दुसऱ्या व्हिडिओमध्ये कंपनी चित्रपट निर्मितीकडे वाटचाल करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. एका मोठ्या अमेरिकन गुंतवणूकदाराने चार धार्मिक चित्रपटांच्या निर्मितीसाठी १,१०० कोटी रुपयांचा करार केला आहे. असा खोटा दावा व्हिडिओमध्ये केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here