Home मनोरंजन ’83’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला…!

’83’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला…!

6485
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी मार्च महिन्यामध्ये चित्रपटगृहे बंद करण्यात आली होती.ज्यामुळे अनेक चित्रपटांच्या रिलीज तारीखा पुढे ढकलण्यात आल्या.त्यानंतर अनलॉकमध्ये चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यात आली आहेत.मात्र,बिग बजेटच्या चित्रपटांना यामुळे फटका बसत आहे. आता १ फेब्रु.पासून चित्रपटगृहे ५० टक्क्यांहून अधिक क्षमतेसह उघडली जाऊ शकतात. त्यानंतर, निर्मात्यांनी त्यांचा मोठा बजेटचे चित्रपट रिलीज करण्याची तयारी सुरू केली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिलायन्स एंटरटेनमेंटनेही आपला आगामी चित्रपट ’83’ चित्रपटगृहात रिलीज करण्याची तयारी सुरू केली आहे. हा चित्रपट होळीला प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता दर्शवली जात आहे.रणवीर सिंहचा हा चित्रपट या अगोदर एप्रिल २०२० मध्ये रिलीज होणार होता.मात्र,लॉकडाऊनमुळे चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली.पण असे असले तरीही चित्रपट रिलीजची नवीन तारीख समोर आलेली नाही.

दरम्यान,रिलायन्स एंटरटेनमेंट ’83’ हा चित्रपट १९८३ मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कपच्या कहाणीवर आधारित असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here