Home आरोग्य किडनी खराब होऊ लागल्याची 4 लक्षणं

किडनी खराब होऊ लागल्याची 4 लक्षणं

234
0


आपल्या शरीरातील साफसफाईचं काम मूत्रपिंड करतं. हा उत्सर्जन प्रणालीचा एक मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. आपल्या दोन्ही मूत्रपिंडांमध्ये दोन लहान फिल्टर असतात, ज्यांना नेफ्रॉन म्हणतात. ते रक्त स्वच्छ करतात. योग्य काळजी न घेतल्यास किडनी निकामी होण्याचा आणि संबंधित आजारांचा धोका वाढतो.मूत्रपिंड निकामी होण्याची लक्षणं इतकी सौम्य असतात की, हा आजार वाढत नाही तोपर्यंत बहुतांश लोकांना काही फरक जाणवत नाही. दुखापतीमुळे, उच्च रक्तदाबामुळे किंवा मधुमेहामुळं मूत्रपिंडं खराब झाल्यास ती शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करू शकत नाहीत, ज्यामुळं विषारी घटक तयार होतात. अशा स्थितीत मूत्रपिंडं नीट काम करत नाहीत आणि विषारी पदार्थ जमा होऊ शकतात.

  1. वारंवार लघवी होणं
    वारंवार लघवी होणं हे देखील मूत्रपिंडं निकामी होण्याचं लक्षण आहे. एखादी सामान्य निरोगी व्यक्ती दिवसातून 6-10 वेळा लघवी करते. जर तुम्हाला यापेक्षा जास्त वेळा लघवी करावी लागत असेल तर, काळजी घ्या. मूत्रपिंडाच्या समस्येच्या बाबतीत, व्यक्तीला खूप जास्त वेळा किंवा खूप कमी वेळा लघवी करण्याची इच्छा होते. या दोन्ही परिस्थिती मूत्रपिंडांना नुकसान पोहोचवतात. काही वेळा काही लोकांच्या लघवीतून रक्तही येऊ लागतं. खराब झालेल्या मूत्रपिंडांमुळं लघवीमध्ये रक्त पेशींची गळती झाल्यामुळं असं होऊ शकतं.
  2. अशक्तपणा आणि थकल्यासारखं वाटणं
    सतत अशक्तपणा आणि थकवा जाणवणं ही मूत्रपिंडाच्या समस्येची सुरुवातीची लक्षणं आहेत. मूत्रपिंडांचा आजार गंभीर झाल्यामुळं, व्यक्ती पूर्वीपेक्षा अधिक अशक्त आणि थकल्यासारखे वाटते. चालतानाही थोडा त्रास जाणवतो. हे मूत्रपिंडात विषारी पदार्थ जमा झाल्यामुळं होतं.
  3. त्वचेचा कोरडेपणा आणि खाज सुटणं
    त्वचेमध्ये कोरडेपणा आणि खाज येणं हे देखील मूत्रपिंडांच्या विकाराचं मुख्य लक्षण आहे. जेव्हा मूत्रपिंड शरीरातील विषारी द्रव्यं काढून टाकण्यास सक्षम नसतात, तेव्हा असं होतं. नंतर हे विषारी पदार्थ रक्तामध्ये जमा होऊ लागतात, ज्यामुळं त्वचेला खाज सुटणं, दुर्गंधीसह कोरडेपणा येणं या समस्या येतात. तुम्हालाही ही लक्षणं दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
  4. हात आणि पाय सुजणं
    आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, मूत्रपिंडं शरीरातील कचरा आणि अतिरिक्त सोडियम फिल्टर करण्यास मदत करतात. जेव्हा मूत्रपिंडं योग्यरित्या काम करणं थांबवतं, तेव्हा सोडियम शरीरात जमा होऊ लागतो. यामुळं पिंढऱ्या आणि घोट्याला सूज येते. या स्थितीला एडिमा म्हणतात. सामान्यतः टॉक्सिक किडनीमध्ये डोळे आणि चेहऱ्यावर सूज येणं दिसून येतं. परंतु त्याची लक्षणं हात, पाय आणि घोट्यांवर सर्वांत जास्त परिणाम करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here