Home क्राइम बलात्कारानंतर रेल्वे रुळांवर फेकलं…..!

बलात्कारानंतर रेल्वे रुळांवर फेकलं…..!

271
0

मराठवाडा साथी
इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूर हे गुन्हेगारीचं शहर बनलं आहे. शहरात बुधवारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. क्लासहून परतणाऱ्या कॉलेजच्या तरुणीचं अपहरण करून पाच जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला गोणीत भरून रेल्वे रुळांवर फेकले. तरुणीने आरडाओरड केल्यानंतर तेथील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तिला रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू आहेत.
शहरातील बाणगंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तिला भागीरथपुरा परिसरातील रेल्वे रुळांवर फेकले. १८ वर्षीय पीडितेने पोलिसांना सांगितले की, पाटणीपुरा परिसरात ती क्लासला जाते. मंगळवारी संध्याकाळी ती क्लासहून परतत होती. वाटेतच तिला एक मित्र भेटला. त्याच्यासोबत अन्य एक मित्र होता. दोघांनी तिला गप्पांमध्ये गुंतवले आणि दुचाकीवर बसवून भागीरथपुरा येथे रेल्वे रुळांजवळ नेले. तिथे आधीच तिघे जण होते. त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
बलात्कारानंतर आरोपींनी तिच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर गोणीत बांधून त्यावर रॉकेल ओतले. तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रेल्वे रुळांजवळ फेकून ते पसार झाले. तरुणीने आरडाओरड केली. तेथे असलेल्या लोकांनी धाव घेऊन तिला गोणीतून बाहेर काढले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली. जखमी अवस्थेत तरुणीला एमवाय रुग्णालयात दाखल केले. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रात्री उशिरा एका आरोपीला पकडले. पोलीस घटनेचा तपास करत असून, सर्व आरोपींना अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here