Marathwada Sathi

शेतकऱ्यांच्या मदतीवर संभाजीराजेंचा हल्लाबोल

राज्यात ऐन उन्हाळाच्या दिवसांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह कोकण या ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. यावरून भाजपा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे.
राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले. त्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसानीची मदत दिली जाईल अशी घोषणा करण्यात आली. तर पंचनामे न करता शेतकऱ्यांना मदत जाहीर करा अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. त्यासंबंधित त्यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट केले की, अवकाळी पाठोपाठ गारपीटीने शेतकऱ्याला ग्रासले आहे. उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने व कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असताना सरकार व कृषीमंत्री साधे धीर देतानाही कुठे दिसत नाहीत. इतकी असंवेदनशीलता कुठून येते? शेतकरी जगाला तर तुम्ही जगाल, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

Exit mobile version