Marathwada Sathi

विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन ;विरोधकांची विधीमंडळाच्या पाऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा सुरु झाला आहे. आजही विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन झाल्याचे पाहायला मिळालं.
विरोधक सभागृहात कांदे, द्राक्ष घेऊन दाखल. शेतकरी प्रश्नावरुन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीआंबा, काजूला भाव द्या, कांद्याला भाव द्या, कापसाला भाव मिळालाच पाहिजे. गारपीठग्रस्तांना नुकसान भरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, विरोधकांची घोषणाबाजीईडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे, ईडीची पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे… अशा गगनभेदी घोषणा दिल्या.महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी केली.कांदा, द्राक्षाचे टोपले घेऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन करत जोरदार निदर्शनं केली.शेतकरी संकटात सापडला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तात्काळ मदत करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा चौदावा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी कांदा, द्राक्षाचे टोपले घेऊन विधानभवनात प्रवेश केला.

Exit mobile version