Marathwada Sathi

उन्हाळ्यात चेहऱ्यासाठी बर्फाचा उपयोग असाही

उन्हाळ्यात चेहरा टवटवीत आणि चमकदार ठेवणे कठीण काम आहे. असे असतानाही, बर्‍याच स्त्रीया आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून त्वचेची काळजी घेत असतात. उन्हापासून त्वचेचे सरंक्षण करण्यासाठी आपण अनेक गोष्टींचा वापर करत असतो. त्वचेच्या काळजीसाठी बरेचदा आपण बर्फाचे तुकडे लावतो. चेहऱ्यावर बर्फाचे तुकडे लावण्याचे फायदे केवळ चेहरा थंड ठेवण्यापुरते मर्यादित नाही. यामुळे तुमच्या चेहऱ्याला थंडावा तर मिळतोच शिवाय चेहरा टवटवीत आणि टवटवीत दिसतो. उन्हाळ्यात चेहऱ्यावर बर्फाचे तुकडे लावल्याने त्वचा आणि आरोग्याशी संबंधित अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊया चेहऱ्यावर बर्फाचे तुकडे वापरण्याचे काय फायदे आहेत.

१. उन्हाळ्यात बर्फाच्या तुकड्यांच्या मदतीने आपण त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळवू शकतो. यासाठी बर्फाचे तुकडे कापडात किंवा आइस पॅक चेहऱ्यावर ठेवून दहा मिनिटे मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील मुरुमे , टॅनिंग, सनबर्न आणि सुरकुत्या दूर होण्यास मदत होईल.

२. उन्हाळ्यात अनेकदा चेहऱ्यावर सूज येते, जळजळ होते, खाज येते असे अनेक प्रकार होतात. अशा परिस्थितीत आपण आइस क्यूबने चेहऱ्याला मसाज करू शकतो. याने आपल्या चेहऱ्यावरील सूज तसेच इतर समस्यांपासून सुटका होऊ शकते.

३. मेकअप दीर्घकाळ टिकवण्यासाठी महिला सहसा चेहऱ्यावर प्राइमर वापरतात. अशावेळी, बर्फाचे तुकडे आपल्यासाठी प्राइमर म्हणून काम करू शकतील. मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर बर्फाचे तुकडे चोळल्याने आपला मेकअप जास्त काळ टिकतो.

४. बर्फाच्या तुकड्यांनी चेहऱ्याला मसाज केल्याने चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारते. तसेच त्वचा फ्रेश आणि ग्लोइंग राहण्यासोबतच आपण सुंदर दिसू लागतो.

५. तसेच बर्फाचे खडे कपड्यात घेऊन डोळ्यांवर ठेवल्यास डोळयांनची होणारी जळजळ, खाज लागणे, डोळे दुखी कमी होऊ शकते. बर्फाने डोळ्यांवर हलका मसाजही करू शकता.

Exit mobile version