Marathwada Sathi

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री? आज सायंकाळी सात वाजता शपथविधी

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. भाजपकडून सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. आज संध्याकाळी 7 वाजता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार असल्याचे आता समोर आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून तर शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आज सायंकाळी सात वाजता शपथ घेणार आहेत. सकाळीच एकनाथ शिंदे हे देखील गोव्याहून मुंबईत दाखल झाले. शिंदे यांनी सागर बंगल्यावर फडणवीस यांची भेट घेतली.त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राजभवनात दाखल झाले आहेत. संध्याकाळी 7 वाजता या दोन्ही नेत्यांचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. भाजपाचे मोठे नेतेही राजभवनाकडे निघाले आहेत. राजभवनावर जाऊन देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सरकार बनवण्याचा दावा करतील. दरम्यान या पार्श्वभूमीवर राजभवन परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

Exit mobile version