Marathwada Sathi

जिल्हा परिषदेच्या शाळा ‘अंधारात’…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : राज्य सरकारने मागविलेल्या माहितीमध्ये अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.वीज बिल भरले नाही म्हणून राज्यातील तब्बल १० हजार ६७१ जिल्हा परिषद शाळांची वीज बंद करण्यात आली आहे.यामुळे २७ जाने.पासून शाळा सुरू करायच्या असतील, तर त्याआधी या शाळांची वीजजाडणी पूर्ववत होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

नेहमी शाळेचे हे बिल मुख्याध्यापक त्यांच्याकडे येणाऱ्या निधीतून भरत असतात.मात्र,यंदा निधी थांबविण्यात आल्यामुळे अनेक शाळांना वीज बिलाचा भरता आलेली नाही.याबाबत शासनाला माहिती असून सुद्धा या शाळांची वीज कापण्यात आली आहे.अनेक गावांमध्ये लोकांच्या पुढाकारातून शाळा डिजिटल केल्या आहेत.मात्र,आता या शाळांमध्ये वीज नसल्यामुळे शिक्षक शाळेत आले,तरी ऑनलाइन वर्गासाठी त्यांना मोबाइलचाच वापर करावा लागत आहे.यामुळे सुविधा असूनही त्याचा फायदा घेता येत नाही.

दरम्यान,प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘डिजिटल इंडिया’ ऑनलाइन शिक्षण या सर्वाकडे लक्ष केंद्रीत करत असताना जिल्हा परिषद शाळांना व्यावसायिक दराने वीज बिल आकारणे योग्य नाही, असे मत शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते भाऊसाहेब चासकर यांनी नोंदविले. सरकारने शाळांनी स्वस्त दरात वीज उपलब्ध करून दिल्यास डिजिटल माध्यमांचा वापर अधिक सुलभ होऊ शकेल.तसेच शाळांचे थकलेले बिले येत्यादिवसांत भरली जातील यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याचे देखील ते म्हणाले.

Exit mobile version