Home बीड युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

233
0

किल्ले धारूर : धारूर शहरामध्ये महावितरण मध्ये काम करणाऱ्या मंगेश हनुमान कोसम या 21 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. महावितरण मध्ये काम करणारा युवक हा नांदेड शहरातला रहिवासी असून तो धारूर येथील महावितरण कंपनीमध्ये अप्रेंटिस करण्यासाठी आलेला होता. तो केज रोड येथील कोमटवार  कॉम्प्लेक्समध्ये किरायाने राहत होता. त्याचे दोन मित्र दिवाळीसाठी गावी गेले होते व काल रात्री त्याला गावाकडून  फोन आला की, “आजी वारली आहे तू गावाकडे ये” पण त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मृत्यूचे कारण समजले नाही. घटनास्थळी धारूर पोलीस स्टेशनचे  पीएसआय प्रदीप डोलारे यांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here