Home इतर कचऱ्याच्या वादावरून केली तरुणाची हत्या…!

कचऱ्याच्या वादावरून केली तरुणाची हत्या…!

259
0

मराठवाडा साथी न्यूज

कोल्हापूर : कचरा टाकायच्या वादावरून चक्क भावांनी मिळून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.कोल्हापूरमधील क्रांतीसिंह नाना पाटील नगरामध्ये बुधवारी(६ जाने.)हि घटना घडली.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार क्रांतीसिंह नाना पाटील नगरामध्ये वांजळे आणि कचरे हे एकमेकांचे शेजारी राहतात.काल(६ जाने.)संध्याकाळी कचऱ्यावरून त्यांच्या भांडण झाले.भांडण एव्हढे वाढत गेले की त्यानंतर भारत कचरे, दिलीप कचरे आणि सुरेश कचरे या तिन्ही भावांनी मिळून आकाश वांजळे या २५ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला केला.या हल्ल्यात आकाश गंभीर रित्या जखमी झाला असता उपचारासाठी त्याला तेथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.मात्र उपचारादरम्यानच आकाशचा मृत्यू झाला. आकाशचा मृत्यू झाल्याने रुग्णालय परिसरात खळबळजनक वातावरण निर्मण झाले होते.घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले .

दरम्यान,घटनेचा तपास करवीर पोलिसांकडून सुरु असून तीन संशयितांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here