Marathwada Sathi

विजेच्या धक्क्याने कामगारांचा मृत्यू…!

मराठवाडा साथी न्यूज

अहमदनगर : लोखंडी पाइपमध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने शॉक बसूनकामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धक्कादायक घटना उघड झाली आहे.अहमदनगर फोर्जिंग कंपनीत २४ जाने.सायं.४ वाजेच्या सुमारास चाकण एमआयडीसीतील कुरुळी ता.खेड गावाच्या हद्दीत ही घटना घडली आहे.लोखंडी पाइपमध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने शॉक बसून दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान,विजय ढवळा लोहकरे(वय २०, सध्या रा. नाणेकरवाडी, चाकण, मूळ रा. राजपूर,भीमाशंकर)आणि ज्ञानेश्वर रामदास ठोकळ (वय २६, सध्या रा. राजगुरुनगर, मूळ रा. गाडेवाडी, भीमाशंकर) अशी या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कामगारांना शॉक बसल्यानंतर त्वरित उपचारासाठी चाकणमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा त्यांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. म्हाळुंगे इंगळे पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

Exit mobile version