मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि तिच्या वंडरवुमनच्या भूमिकेने जगभर ओळखली जाणारी गॅल गडोटने शाहीन बागच्या ‘बिलकीस दादी’ला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गॅल गडोटने न्यूईयरच्या निमित्ताने वर्षभरात चर्चेत आलेल्या काही महिलांचे फोटो शेअर केले आहेत.गॅल गडोटच्या दृष्टीने या महिला २०२० मधील वंडर वुमन्स असल्याचे ती म्हणाली.या पोस्टमध्ये ‘बिलकीस दादी’चाही समावेश करण्यात आला आहे.
“२०२० ला मागे टाकत माझ्या आयुष्यातील वंडर वुमन्सना माझ्याकडून खूप खूप प्रेम. यांमधील काही माझ्या आयुष्यातील अत्यंत जवळच्या महिला आहेत, काही माझ्या कुटुंबातील, तर काही मैत्रिणी आहेत. तसेच यामध्ये काही प्रेरणादायी महिला आहेत, ज्यांच्याबाबत ऐकून मला खरंच खूप आनंद झाला. तसेच यामध्ये काही अशा महिलाही आहेत, भविष्यात ज्यांची भेट घेण्याची माझी इच्छा आहे. आम्ही एकत्र येऊन चांगले काम करु शकतो. तुम्हीही तुमच्या आयुष्यातील वंडर वुमन्स माझ्यासोबत शेअर करा.”तिच्या आयुष्यातील वंडर वुमन्सचे फोटो शेअर करत पोस्टखाली गॅलने असे कॅप्शन दिले आहे.
दरम्यान,२०२० मध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात शाहीन बाग येथे पार पडलेल्या आंदोलनात ८२ वर्षीय ‘बिलकीस दादी’ने उपस्थित राहत सर्वांचे लक्ष वेधले होते.सकाळपासून ते रात्रीपर्यंत या आंदोलनाकरीता बिलकीस दादी उपस्थित होत्या.फक्त एव्हढेच नाही तर आंदोलनानंतर ‘बिलकीस दादी’ यांची ओळख शाहीन बागची दादी अशीही झाली.त्यामुळे टाईम मॅगझिनने २०२० मधील सर्वाधिक प्रभावशाली १०० व्यक्तींमध्येही बिलकीस बानो यांचा समावेश केला होता.
https://www.instagram.com/p/CJcOvQ3B5ii/?utm_source=ig_web_copy_link