Home जालना बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर

बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर

13
0

मराठवाडा साथी न्यूज
जालना :
बदनापूर तालुक्यातील वजारवाडी येथील 70 वर्षीय वृद्ध महिलेला बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


याविषयी सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील वंजारवाडी येथील 70 वर्षीय कौशल्याबाई चौधरी ही वृद्ध महिला तिच्या शेतात मिरच्या तोडत असताना अचानकपणे बिबट्याने तिच्यावर हल्ला बोल केला व तिच्या गळ्याला, हाताला, कमरेला चावा घेऊन तीस गंभीर जखमी केले आहे. सदरील घटना ही सोमवारी सायंकाळी 4 च्या सुमारास घडली.


ही बाब महिलेच्या पुतण्यास माहीत पडताच त्याने चुलती कौशल्याबाईस जालनाच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. हा बिबट्या याच परिसरात फिरत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. याला दोन दिवसांपूर्वीच 2 जणांनी रात्रीच्या वेळेस शेततळ्यात पाणी सोडण्याकरिता गेले असता पाहिल्याचे सांगण्यात येत आहे. या बिबट्याने या परिसरातील काळविटाचेही बळी घेतल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे वंजारवाडीत भीतीचे वातावरण पसरलेले आहे. संबंधीत विभागाने तातडीने सदरील बिबट्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा या बिबट्यामुळे आणखी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे, असे परिसरातील गावकऱ्यांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here