Home बीड दर महिन्याला लग्न करून नवरदेवांना लुटणारी महिला पोलीसांच्या जाळ्यात

दर महिन्याला लग्न करून नवरदेवांना लुटणारी महिला पोलीसांच्या जाळ्यात

लॉकडाउनच्या काळात पैशासाठी केला अनोखा उद्योग!

239
0

लॉकडाउनच्या काळात पैशासाठी केला अनोखा उद्योग!

मराठवाडा साथी न्युज

बीड : पैशासाठी कोण कधी काय करेल याचा भरोसा राहिलेला नाही. लॉकडाउनच्या काळात बेरोजगार झालेल्या एका महिलेने आणि तिच्या पतीने चोरीचा मार्ग अवलंबला होता. परंतु नाशिकच्या एका तरुणामुळे त्यांच्या अनोख्या उद्योगाचा भंडाफोड झाला आहे. प्रत्येक महिन्याला नवीन तरुणांसोबत लग्न करून त्यांची लुट करणारी महिला औरंगाबादमधील आहे. या महिलेने तीन महिन्यांत तीन लग्ने केली आणि त्यांच्याजवळील दागिने चोरले आहेत.३ महिन्यांत ३ लग्न करून त्यांच्याकडील दागिने घेऊन पोबारा करणाऱ्या या विजया नामक २७ वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. लॉकडाउनच्या काळात ती आणि तिचा पती बेरोजगार झाला होता. त्यामुळेच त्यांनी हा पैशासाठी नवीन मार्ग अवलंबल्याची माहिती समोर आली आहे.
मागील तीन महिन्यांत तीन जणांनी लग्न केली. मात्र, त्यांच्याकडील दागिने लुटून महिला पसार झाली.
नाशिक जिल्ह्यातील एका तरुणामुळे या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या फसव्या नवरीने लग्न केलेल्या एका नवरदेवाने आपल्या पत्नीचा शोध चालू केला तेव्हा शोध घेत असताना तिने आणखी नुकतेच अन्य एका तरुणाशी लग्न केल्याचे त्याला समजले. या तरुणाकडे ती जवळपास पंधरा दिवस राहिली होती. त्यानंतर ती पळून गेली. तिने नंतर रायगडमधील कर्जत तालुक्यातील एका तरुणाशी लग्न केले. त्यानंतर मग तिने आणखी पश्चिम महाराष्ट्रातील एका तरुणाशी लग्न केले. हे तिचे तिसरे लग्न होते. लग्नासाठी मुलींच्या शोधात असलेल्या तरुणांना जाळ्यात ओढून लग्न करायचे आणि त्यांना लुटायचे हा अनोखा उद्योग यांनी चालू केला होता. या रॅकेटमध्ये महिला आणि तिचा पतीही सामील झाला होता. लग्न ठरल्यानंतर ते लग्नासाठी झालेला खर्च आणि लग्नानंतर काही दिवसांनी मग ते पतीचे दागिने घेऊन पसार व्हायचे, अशी माहिती उघडकीस आली आहे. लग्नासाठी ईच्छुक असलेल्या तरुणांची अशाप्रकारे फसवणूक होत आहे परंतु तीन महिन्यांत तीन लग्न करणारी औरंगाबादची विजया आता पोलीसांच्या जाळ्यात आडकली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here