Marathwada Sathi

दारु विक्रेत्यांच्या अड्ड्यावर महिलांचा हल्लाबोल…!

मराठवाडा साथी न्यूज

नागपूर : येरला गावातील महिलांनी दारु विक्रेत्यांची वाहने जाळून,त्यांच्या अड्ड्यातून अवैध दारु साठा जप्त केल्याची घटना रविवारी(१७ जाने.)मध्यरात्री उघड झाली आहे.मागील अनेक महिन्यांपासून येरला गावातील महिलांनी अवैध दारु विक्री बंद करण्याची मागणी लावून धरली होती.मात्र तरीही दारु विक्रीचा धंदा सुरुच होता.

त्यातच किरकोळ कारणावरुन रविवारी(१७ जाने.)रात्री दारु विक्रेत्यांनी गावातील दोन तरुणांना मारहाण केली.त्यांच्या मारहानीला उत्तर देत चिडलेल्या महिलांनी एकत्रित येत अवैध दारु अड्ड्यावर हल्लाबोल करत विक्रेत्यांना मारहाण केली.त्यामुळे दारू विक्रेते तेथून पळून गेले.पण महिला मात्र तेथेच थांबल्या नाहीत तर त्यांनी त्यानंतर दारू विक्रेत्यांच्या ६ दुचाकी देखील जाळल्या.

दरम्यान,या घटनेनंतर १८ जाने. दोन तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी गोलू वर्मा, आनंद वर्मा, अमिनेश वर्मा आणि त्यांचे तीन ते चार साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Exit mobile version