Home अहमदनगर शिर्डीतून अचानक बेपत्ता झालेली महिला…!

शिर्डीतून अचानक बेपत्ता झालेली महिला…!

87
0

मराठवाडा साथी न्यूज

अहमदनगर : शिर्डीतून साडेतीन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली ही महिला १७ डिसेंबर २०२० रोजी इंदूरमध्ये तिच्या बहिणीच्या घरी सापडली.आपण चक्कर येऊन पडलो. त्यानंतर पुढे काय झाले ते काहीच आठवत नाही. इंदूरमध्ये कसे पोहचलो, मधल्या काळात कोठे होते, काहीच आठवत नसल्याचे ही महिला सांगत नाही मात्र, पोलिसांचा संशय कायम होता. इंदूरमधील हनुमान गाथा सांगणाऱ्या ओमप्रकाश चंदेल याच्यावर पोलिसांचा संशय होता. तो या महिलेचा लग्नाआधीपासूनच प्रियकर होता . त्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली होती. त्यामुळे आता आपण पकडले जाऊ या भीतीने त्याने त्या महिलेला बहिणीच्या घरी सोडले आणि स्मृतीभ्रंश झाल्याचे नाटक करण्यास सांगितले.

नाटक दीर्घकाळ टिकले नाही. पोलिसांनी त्यांचा भंडाफोड केला. ही महिला जेव्हा कुटुंबासह शिर्डीत दर्शनासाठी आली होती.तेव्हाच पळून जाण्याची योजना आखली होती. खरेदीच्या बहाण्याने बाहेर पडलेल्या महिलेने शिर्डीहून कोपरगाव गाठले. तेथून रेल्वेने ती पुण्याला गेली. तेथे तिचा प्रियकर चंदेल भेटला. नंतर पुण्याहून ते इंदूरला. जेव्हा प्रकरण चंदेलच्या अंगाशी आले, तेव्हा त्याने तिला सोडून दिले. मधल्या काळात त्या महिलेच्या पतीने तिचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम राबविली. शिर्डीतून एवढी माणसे अचानक बेपत्ता होतात आणि परत सापडत नाहीत, याचा अर्थ मानवी तस्करी, अवयव चोरी असे प्रकार घडत असल्याची शंका उपस्थित करण्यात आली. कोर्टाने कागदपत्रे पाहून प्रकरण गांभीर्याने घेतले.थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना यामध्ये लक्ष घालून मानवी तस्करीच्या अनुषंगानेही तपास आणि उपाययोजना करण्याचा आदेश दिला. त्यामुळे शिर्डीची सर्वत्र खूपच चर्चा झाली. या घटनासंबंधी पोलिसांनी त्यावेळीच खुलासा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या माहिलेचा तपास लागत नसल्याने त्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नव्हते. अखेर हा सर्व संयशकल्लोळ निर्माण होण्यास कारणीभूत ठरलेल्या प्रकरणातील बेपत्ता महिला सापडली. ती कशी बेपत्ता झाली,त्यामुळे शिर्डीतून असे काही होत नाही,असे पोलिसानी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here