Home गंगाखेड डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे प्रसूती दरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू

डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे प्रसूती दरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू

310
0

गंगाखेड : पालम तालुक्यातील मौजे बोरगाव (खुर्द) येथील महीला कोमल कैलास बहुरे वय २५ हिचा दि. ८रोजी प्रसुती दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

सविस्तर वृत्त असे की मयत कोमल हिच्या पोटात दुखत असल्याने दि ८ नोव्हेंबर रोजी पहाटे ५:३० च्या सुमारास चाटोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले पण चाटोरी येथील दवाखान्यात डॉक्टरच उपस्थित नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.ग्रामीण भागातील जनतेला जनतेला वेळेवर व योग्य आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी भरघोष निधी उपलब्ध करून देण्यात येतो पण काही डॉक्टरांच्या मनमानी मुळे रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात.या दवाखान्यातील डॉक्टर कधीच उपस्थित नसतात असे गावकरी खाजगीत बोलताना दिसतात.सर्व कामकाज हे परिचारिका वर चालते. गरोदर मातेची काळजी घेण्यासाठी अंगणवाडी सेविका ते तज्ञ डॉक्टर अशी श्रंखला असताना मातेचा मृत्यू केवळ वेळेत व तज्ञ डॉक्टराकडुन उपचार न मिळाल्याने कोमल ला आपला जिव गमवावा लागला आहे. चाटोरी येथील आरोग्य केंद्रात परिचारिकानी नॉर्मल प्रसूती केली पण प्रसुती नंतर रक्त स्त्राव थांबत नसल्याने व डॉक्टर हजर नसल्याने पुढील उपचारासाठी गंगाखेड च्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला व गंगाखेड येथे पाठवुन दिले पण दुर्दैवाने कोमलचा वाटेतच मृत्यू झाला गंगाखेड येथे डॉक्टरांनी कोमलला मयत घोषीत केले.कोमलच्या पोटी जन्माला आलेल्या बाळाला आपली आई पाहता आली नाही आणी जन्मदात्री आपले बाळ पाहता आले नाही. अशा घटना वारंवार घडत आहेत पण दोषी डॉक्टरांवर काहीच कठोर कारवाई होत नाही.या मुळे कोण्या मातेला आपले बाळ. बाळाला आपली आई. किंवा वडील गमवावे लागतात याला जबाबदार कोण.?असा प्रश्न निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here