Home मनोरंजन वरून धवन या महिन्यात करणार लग्न ?

वरून धवन या महिन्यात करणार लग्न ?

47
0

मुंबई: अभिनेता वरून धवन आणि नताशा दलाल कित्येक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता लवकरच म्हणजेच या महिन्यात ते दोघेही लग्न करणार असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत.या दोघांनाही बऱ्याचदा सोबत फिरताना पहिले गेले आहे. तर वरुनच्या प्रत्येक कार्यात ती त्याच्या सोबतच असते. त्यामुळे त्यांच्या लग्नाची वाट त्यांचे चाहते पाहत आहेत.पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, वरूण लग्नाचं स्थळ शोधत आहे. वरूण आणि नताशा अलिबागमध्ये लग्न करणार असल्याचं कळतंय. ते नुकताच पंचतारांकित हॉटेल बुक करण्यासाठी अलिबागला गेला होता. हे एक ग्रँड पंजाबी लग्न असेल. परंतु करोना व्हायरसमुळे या लग्नात फक्त जवळचे लोक उपस्थित असणार आहे. लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी २०० लोकांची यादी तयार केली आहे.त्यामुळे या महिन्यात तो लग्न करणार असल्याचे कळत आहे.

या आधी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत, वरूणने त्याच्या लग्नाविषयी बोलताना सांगितले की, सगळे या विषयी बोलत आहेत. पण जगभरात आता खूप काही सुरू आहे. जर सगळं आधीसारखं स्थिरावलं तर लवकरच मी लग्नाच्या तयारीला लागू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here