Marathwada Sathi

गंगाखेडातील मंदिरे तब्बल 245 दिवसा नंतर ऊघडणार, भाविक निर्बंध पाळणार का?

गंगाखेड : कोरोना कोव्हिडचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी शासनाने पुर्णपणे बंद करण्यात आलेली मंदिरे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर भक्तांना दर्शनासाठी खुले केले जाणार असून तब्बल 245 दिवसा नंतर शहरातील सर्वच मंदिर खुले होणार आसुन शासनाचे निर्बंध भाविक पाळणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दक्षिण गंगा आसलेल्या गोदावरी काठी आसलेल्या गंगाखेड शहर हे मंदिरांचे शहर म्हणुन मराठवाड्यात सर्वञ नावलौकिक आसुन शहराची दुसरी ओळख म्हणजे विठ्ठलाची असीम भक्त श्री संत जनाबाईचे जन्मस्थान अशी आहे तर तिरूमला तिरूपतीचे उपपीठ आसलेल्या बालाजी संस्थानचा दसरा महोत्सव तिरूमला तिरूपती प्रमाणे गेली चारशे वर्षापासुन केला जातो.तर शहरात हेमाडपंथी अनेक मंदिर आसुन शहराचे ग्रामदैवत म्हणजे भक्ताचा तारणहार व जागृत श्री चिंचामणी मंदीर शहरापासुन जवळ आसलेले श्री मन्नाथ मंदिर.नांदेड रोड वरील श्री काशीनाथ महाराज समाधी स्थळ दत्त मंदिर राजवाडा येथील अंधेरी महादेव सह अनेक मंदिराचे शहर आसलेल्या गंगाखेड शहरातील सर्वच मंदिरे कोरोनाचा लाँकडाउन भक्तासाठी बंद झालेली होती.संत जनाई मंदिरात वर्षभर होणाऱ्या भागवत सप्ताह किर्तन सोहळे सह ऐतिहासिक नवराञ दसरा महोत्सवावर कोरोनाचे सावट आसल्याने दसरा महोत्सव रद्द झाला होता.तब्बल 245 दिवसानतंर शासनाने मंदिरे ऊघडण्यास परवानगी दिली आसुन पण भक्तावर अनेक निर्बंध घातले आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षांपर्यंतच्या मुलांना,गर्भवती, गंभीर आजारी नागरिकांना मंदिरात प्रवेश करण्यास, तसेच दर्शनासाठी बंदी असणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार, भाविकांना दर्शन रांगेत सोशल डिस्टन्ससाठी वर्तुळाकार पट्टे ओढली जाणार आहेत. त्यासाठी किमान 6 फूट अंतर राखले जाणार आहे पुजारी महंत आणि मानकरी हे सर्व धार्मिक विधी आणि पुजा सरकारने दिलेल्या कोविड नियमा नुसार करतील भक्तांना इतर पूजा करता येणार नाहीत.मात्र.सामुहिक आरती करता येणार नसून गाभाऱ्यात भक्तांना प्रवेश नाही.

Exit mobile version