Marathwada Sathi

ठाकरे सरकार सहभागी होणार का….

मराठवाडा साथी न्यूज
मुंबईः
केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी ठाण मांडला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु आहे. आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन होत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आझाद मैदानात येणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मोर्च्याला पाठिंबा दिला असून तेदेखील मोर्चात सहभागी होणार का?, अशा चर्चा सुरु आहेत.
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ नये, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्रीपद हे घटनात्मकपद आहे. त्यामुळं त्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये, असं भूमिका शरद पवारांनी घेतली असल्याचं सूत्रांकडून समजतंय. त्याचबरोबर, अद्यापही मुंबईत करोनाचं संकट आहे असं असताना मुख्यमंत्र्यांनी गर्दी असलेल्या ठिकाणी जाऊ नये, असंही पवारांचं मत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं मुख्यमंत्री मोर्च्यात सहभागी होणार असल्याची शक्यता कमी आहे.

Exit mobile version