Marathwada Sathi

लॉकडाउन काळातील गुन्हे मागे घेतले जाणार का?

मुंबई : ‘लॉकडाउनच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८नुसार केलेली कारवाई मागे घेण्यासंदर्भात गृह सचिवांशी चर्चा सुरू आहे. या नागरिकांना देण्यात आलेल्या नोटिसा मागे घेण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ,’ असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.

लॉकडाऊन कालावधीत राज्यभरात लाखो नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून हजारोंना अटकही झाली होती. या सर्वांच्या भवितव्याचा विचार करून आणि कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन गृह विभागाने आता हे गुन्हे मागे घेणार असल्याचं म्हटलंय.या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांसह, नागरिकांवर कलम 188 नुसार कारवाई करण्यात येत होती.

Exit mobile version