Home गंगाखेड सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देतच राहाणार – रामप्रभु मुंढे

सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देतच राहाणार – रामप्रभु मुंढे

43
0

गंगाखेड : जगाचा पोंशिदा शेतकरी आसुन शेतकरी सुखी तर जग सुखी निसर्गाचा चक्रव्युहात शेतकरी सापडला आसताना त्यास मदत देणे सरकारचे कर्तव्य आहे.अतिवृष्टीने हातास आलेले सर्व पिक गेलेले आसताना शासनाचा चुकीचा धोरणामुळे तालुक्यातील अनेक मंडळ ओल्या दुष्काळातुन वगळून शेतकऱ्यांना अनुदाना पासुन वंचीत ठेवण्याचे कट कारस्थान करीत आहेत.शेतकऱ्यांचा प्रश्नासाठी आपण सातत्याने लढा देतच राहु असे प्रतिपादन भाजपाचे रामप्रभु मुंढे यांनी तालुक्यातील राणीसावरगांव येथे ओला दुष्काळ जाहीर करावा या आज दि.१० रोजी रस्ता रोको आंदोलन दरम्यान केले.

श्रीनिवास मुंडे मा.सभापती जि.प.परभणी यांच्या नेतृत्वात राणीसावरगाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.तालुक्यातील सर्व ६ मंडळ वगळण्यात आले आसुन यावर्षी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर पडला शेतकरी बांधवांना सर्व हाताला आलेले पिक गेले. राज्य शासन व प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे शेतकरीविरोधी हे सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना अनुदान पासून वंचित ठेवत आहे, परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टी मधून गंगाखेड तालुका पूर्ण वगळण्यात आला आहे याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही, राज्य शासनाने शेतकरी बांधवाना सोबत लबाडी करत आहे, राज्यशासन झोपेचे सोंग घेत आहे दिवाळी आली तरीसुद्धा मदत नाही – अनुदान नाही शेतकरी बांधवांना वंचित ठेवण्यात येत आहे.परभणी जिल्ह्यातील बोगस बियाणे वर राज्य शासनाने अजून सुद्धा गुन्हे दाखल केले नाहीत शेतकरी बांधवांना न्याय दिला नाही, शेतकऱ्यांनी अजुन किती दिवस संघर्ष करावा आता तरी जागे व्हा आज रस्त्यावर उतरून विनंती करत आहोत तरी सुध्दा तुमचे डोळे उघडत नाहीत शेतकऱ्यांना न्याय द्या.परभणी जिल्ह्यातील आजुबाजूच्या जिल्हाला अनुदान मिळते परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्याला का नाही.तालुक्यास ओला दुष्काळ अनुदान सह विमा व बोगस बियाणे अनुदान मिळे पर्यत भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांसाठी सदैव रस्त्यावर आहे जोपर्यंत सामान्य माणसाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार असे रामप्रभु मुंडे म्हणाले.यावेळी उपस्थित मा.रामप्रभु मुंढे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र, श्रीनिवास मुंडे मा.सभापती जि.प.परभणी, नारायण डोईफोडे, राम नागरगोजे, रवी रायभोळे, महादेव हाके, भास्कर भिसे, नाना केंद्रे, पप्पु जाधव, सखाराम मुसळे, मुदशिर सय्यद, यादव महात्मे, गोविंदराव घुले, विठ्ठल घरजाळे, स्वामी सर, गणेश जाधव, आबाजी मुसळे, बालाजी हाके मा.सरपंच, बाबुराव मुसळे मा.सरपंच, माधव खोकले, ओमकेश आंधळे, मनोज मुंडे, व मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणी करता राणीसावरगाव मंडळातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here