Marathwada Sathi

अदर पुनावाला यांना बायकोची भावुक “पोस्ट “

पुणे : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट इंडियानं ऑक्सफोर्ड- अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या मदतीनं तयार केलेल्या कोव्हिशिल्ड लशीचं देशभरात वितरण करण्यात आले आहे. याचे श्रेय पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या अदार पूनावाला यांना जाते .१४ जानेवारी ला अदर यांनी आपला ४० वा वाढदिवस आपल्या कुटुंबासोबत साजरा केला. याचे फोटो त्यांच्या पत्नी नताशा यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच पत्नी नताशा यांनी पती अदर पुनावाला यांच्यासाठी एक भावुक पोस्ट लिहली आहे.

अदर पुनावाला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नताशा यांनी अनेक रात्री जागून त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमानंतर हे सेलिब्रेशन असल्याचे म्हटले आहे. भविष्यात देखील त्यांना असेच यश मिळो तसेच सध्या थोडीशी झोप गरजेची असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.दरम्यान एका मुलाखतीत अदर यांनी कोरोना व्हायरस विरूद्ध लढा देण्यासाठी प्रत्येक तिमाहीत नवीन लस सुरू करण्याची योजना आखली असल्याचे म्हटले होते . यासाठी सीरम इन्स्टिट्यूट (SII), ब्रिटीश-स्वीडिश औषधनिर्माण कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांच्या सहकार्याने ऑक्सफोर्ड लशीच्या 100 कोटी डोसचे उत्पादन करण्याची योजना आहे. याचबरोबर कंपनी मोठ्या प्रमाणात लशीचं उत्पादन करत असून यावर्षीच्या अखेरपर्यंत अनेक देशांना लस वितरित करणार आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी लशीची मागणी केल्याचंदेखील यावेळी सांगितलं. त्यामुळे लवकरच सर्वसामान्य भारतीयांना देखील या लशी उपलब्ध होण्याची आशा आहे.

https://www.instagram.com/p/CKB3Y3eBrJY/?utm_source=ig_web_button_share_sheet

Exit mobile version